Sunday, March 25, 2012

लघुउद्योजकांना मार्केटिंगसाठी फसबूक च साथ ( Small Business Marketing on Facebook )

एखाद्या महाकाय प्रकल्पाकरिता आवश्यक नट-बोल्ट्सपासून दैनंदिन वापराच्या वस्तूंची निर्मिती करणार्‍या लघुउद्योजकांना आता स्वत:च्या मार्केटिंगसाठी हक्काचे आणि मोफत असे व्यासपीठ लाभणार आहे. हे व्यासपीठ असणार आहे फेसबुकचे. या माध्यमातून ते केवळ आपल्या विभागातील नव्हे, तर जगाच्या बाजारपेठेत मुशाफिरी करतानाच व्यवसायवृद्धी करू शकतील.
भारतीय अर्थव्यवस्थेची धमनी समजल्या जाणार्‍या लघुउद्योजकांना पाठबळ मिळावे, याकरिता नुकताच मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने त्यांना व्यवहारासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आता त्यापाठोपाठ उद्योग क्षेत्राची शिखर संस्था असलेल्या फिक्कीने याबाबत पुढाकार घेत थेट फेसबुकशी करार केल्याने लघुउद्योजकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
विविध उत्पादनांची निर्मिती करणार्‍या लघुउद्योजकांपुढे सर्वात मोठी समस्या असते ती, स्वत:च्या उत्पादनाच्या मार्केटिंगची. कारण याकरिता मोठय़ा प्रमाणात आर्थिक पाठबळ आवश्यक असते. ते नसल्यामुळे मार्केटिंग शक्य होत नाही. आजच्या घडीला देशामध्ये लघुउद्योजकांचे कार्यक्षेत्र म्हणून गणली जातील, अशी एकूण ६४00 इंडस्ट्रीयल क्लस्टर आहेत. याखेरीज असंख्य ठिकाणी लघुउद्योजक हे विखुरलेल्या स्वरूपात आहेत. त्याचा मोठा फायदा त्यांना होईल.
फेसबुकमुळे होणार कायापालट
फेसबुकच्या माध्यमातून भारतीय लघुउद्योजकांसाठी विशेष पेज तयार करण्यात येईल.
या पेजच्या माध्यमातून उद्योजकांना एकमेकांशी संवाद साधता येईल.
ल्ल नेटवर्किंग करणेही
शक्य होणार आहे.
उद्योजकांनी जर स्वत:च्या उद्योगाच्या नावे अकाऊंट काढले, तर त्यांना सहभागी होता येईल.
व्यक्तिगत खातेधारकही सहभागी होऊ शकतात; पण उद्योगाच्या नावे असल्यास थेट फायदा प्रमोशनकरिता होऊ शकेल.
फेसबुकचा उद्योग
युरोपात फेसबुकने दिलेल्या पेजमुळे तेथील उद्योजकांच्या व्यवसायामध्ये सकारात्मक बदल झाला.
लघुउद्योगाने गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक, म्हणजे ६५ टक्के
रोजगाराची निर्मिती केली आहे.
ल्ल गेल्या तीन वर्षांत फेसबुकच्या माध्यमातून सुमारे दोन लाख ३२ हजार लोकांना रोजगार
मिळाला आहे.
फेसबुकच्या माध्यमातून होणार्‍या जाहिरातींची उलाढाल १५ अब्ज पौंड इतकी आहे.
भारतात येत्या वर्षभरात
किमान १२ टक्के लोकांना
फेसबुकच्या माध्यमातून रोजगार मिळेल, असा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment