Sunday, March 25, 2012

मुंबईकिनारी जहाजावर स्फोट, 1 ठार ( Spot on Ship near Mumbai Seacoast)

द. कोरियाच्या रॉयल डायमंड-७ या मालवाहतूक जहाजावर आज दुपारी स्फोट होऊन उडालेल्या भडक्यात एक ठार तर ७ जण जखमी झाले.

जहाजातील स्टर्लिन गॅसचा हवेशी संपर्क होऊन आग लागल्याचे समजते. रसायनांनी भरलेल्या एम.टी. रॉयल डायमंड-७ या परदेशी जहाजाला मुंबई-अलिबाग सागरीमार्गावर बुचर आयलॅण्डजवळ १७ जानेवारीला आग लागून तिघे जखमी झाले होते. आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी ते बुचर बेटाजवळच थांबवण्यात आले होते. आज त्यावर स्फोट झाला.

जहाजावरील स्फोट स्टर्लिंग गॅसमुळे

एम.टी. रॉयल डायमंड-७ वर अचानक घडलेल्या या घटनेमुळे जहाजावरील कर्मचार्‍यांत मोठी घबराट निर्माण झाली होती.

पावणेबाराच्या सुमारास जहाजातील स्टर्लिग गॅसचा हवेशी संपर्क झाल्याने स्फोट झाला. त्यावेळी तेथे असलेला कर्मचारी मेऑन च्योको हा पूर्णपुणे होरपळला गेला. तर अन्य सातजणही भाजून बाजूला पडले. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कर्मचार्‍यांनी तातडीने जखमींना बाहेर काढले. च्योको यांना मसीना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र ते ९९ टक्के भाजले गेल्याने उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

तर किग मॅन होन (२९), मून च्यून पेट (५७, दोघे रा. कोरिया), अफाटो आयर दारखो ३४, फिलीपन्दस), शोभनाथ जगनाथ रावत (३६), राजा यमूनाप्रसाद रावत (३५) शनी शोभनाथ रावत (२५), तिरोत मातादीन रावत (३२) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सेंट जॉर्ज व जे.जे.हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

No comments:

Post a Comment