Wednesday, March 21, 2012

विविध सेवांच्या शुल्कात १ एप्रिलपासून तब्बल १० टक्के वाढ - Mumbai

बीएमसी
बीएमसी
मुंबई: केंद्र आणि राज्य सरकारनं महागाईचा चटका दिल्यानंतर आता पालिकेनंही मुंबईकरांना झटका दिलाय. पालिका आयुक्तांच्या मंजुरीच्या कक्षेतील विविध सेवांच्या शुल्कात १ एप्रिलपासून तब्बल १० टक्के वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलाय. आज पालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यात हा निर्णय घेण्यात आलाय.

यापुढे आता पालिकेची कुठलीही सेवा तुम्हाला आता घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला १० टक्के अधिकचं शुल्क मोजावं लागेल.

इतकच नाही तर व्यापाऱ्यांना लागणाऱ्या लायसन्स फीमध्ये ७५ टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय.
पालिकेच्या सेवांमध्ये वृक्ष प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या सेवा, पालिकेची मैदानं, पालिकेचे हॉल, साफसफाई आणि सर्व प्रकारच्या डागडुजीच्या कामांचा समावेश आहे.

दुसरीकडे पालिकेनं पाणीपट्टीतही घसघशीत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. त्यामुळं मुंबईकरांची पाणीपट्टी १४ ते ६७ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. आता या प्रस्तावाला स्थायी समितीत मान्यता मिळते का हे पाहायचंय. पाणीपट्टीत वाढ झाली तर पालिकेचं उत्पन्न ३१३ कोटींनी वाढेल.

No comments:

Post a Comment