वेडिंग गाऊल
या वेडिंग गाऊनच्या प्रदर्शनासाठी एका मॉडेलला हॉटएअर बलूनमध्ये बसावं लागलं. हा अनोखा गाऊन रुमानियाची राजधानी बुखारेस्टमध्ये तयार झाला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या गाऊनची दखल घेत नवा विक्रम या गाऊनच्या नावावर केला.
हा विक्रम आधी एका डच डिझायनरच्या नावावर होता. हा गाऊन तयार करण्यासाठी कारागिरांना तब्बल १०० दिवस लागले.
या विक्रमामागे आणखी एक वैशिष्ट्य आहे. रुमानिया आणि नेदरलंड्स या दोन देशात व्हीसा फ्री ट्रॅव्हलच्या मुद्द्यावरून वैर आहे. नेदरलंड हा देश रुमानियाला व्हिसा फ्री ट्रॅव्हल असलेल्या देशांच्या यादीत घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे नेदरलंड्सच्या एका डिझायनरचा विक्रम मोडल्याने रुमानियामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
No comments:
Post a Comment