Thursday, March 29, 2012

मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लासच्या प्रवासी भाड्यात वाढ ( Mumbai Local increase rate to first class passenger )

रेल्वे तिकीट
रेल्वे तिकीट
मुंबई: महागाईने होरपळलेल्या मुंबईकरांना आणखी एक झटका बसला आहे. लोकलच्या प्रथम श्रेणीतील भाड्यात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ अंदाजे ६ ते १५ टक्के असणार आहे.

रेल्वे अर्थसंकल्पात लोकल प्रवाशांना दिलासा देत असल्याचं चित्र रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी उभं केलं होतं. मात्र  सोईस्कररीत्या त्यामध्ये प्रथम श्रेणीचा समावेश केला नव्हता. त्यामुळेच आता ही दरवाढ करण्यात आली आहे.

नव्या भाडेवाढीनुसार ५० किलोमीटरला २० रुपये, १०० किलोमीटरला ३० रुपये तर १५० किलोमीटरला ४० रुपये अशी  दरवाढ असणार आहे. आधीच्या घोषणेप्रमाणे द्वितीय श्रेणीच्या प्रवासासाठी कोणतीही दरवाढ झालेली नाही.

दरम्यान या वाढीव भाडेवाढीत ६६६ रुपयांची रक्कम असल्यास ती ६७० रुपये अशी राऊंड फिगर करण्यात येणार आहे.

पाससाठी नवे दर
प्रवास
मासिक
तिमाही
सीएसटी-वाशी
रु. ५०५
रु. १३७५
चर्चगेट-दादर वा सीएसटी-दादर
रु. २९५
रु. ८१०
चर्चगेट-बोरिवली
रु. ५७५
रु.१५६५
सीएसटी-कल्याण
रु. ८५५
रु. २३२५
सीएसटी-ठाणे
रु. ५७५
रु.  १५६५

No comments:

Post a Comment