Friday, March 23, 2012

लोकमत ने आयोजित केलि फसबूक वर छायाचित्र स्पर्धा ( Lokmat organised photography competition on facebook )


साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला गुढी पाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या दिवशी घरा-घरांमध्ये गुढय़ा उभारल्या जातात, देशभरातल्या अनेक शहरांमधून स्वागतयात्रांचे आयोजन केले जाते, भव्य रांगोळ्य़ा काढल्या जातात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने आनंद साजरा केला जातो. पाडव्याच्या दिवशी सकाळपासून पारपंरिक कपडे परिधान करून ग्रामदैवताचे दर्शन घेण्याची आणि त्यानंतर आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तमाम जनतेची लगबग उडालेली असते. अशावेळी व्यावसायिक छायाचित्रकारांपासून ते मोबाईलवर फोटो क्लिक करणार्‍या हौशी छायाचित्रकारांपर्यंत सगळ्य़ांना काय टिपावं आणि काय नको असा प्रश्न पडावा इतकी संधी गावा गावांमध्ये उपलब्ध असते.

समृद्धीचे, विजयाचे आणि सुखा-समाधानाचे प्रतीक मानल्या गेलेल्या अशा या गुढी पाडव्याच्या निमित्ताने लोकमत तुमच्यातल्या छायाचित्रकाराला साद घालत आहे, ते एका आगळ्य़ा-वेगळ्य़ा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी. मराठी वाचकांच्या मनात मानाचं स्थान असलेल्या फेसबुकवरील लोकमतच्या वॉलवर ही स्पर्धा रंगणार आहे. तुम्ही गुढी पाडव्याच्या दिवशी काढलेल्या छायाचित्रांपैकी तुम्हाला आवडलेले छायाचित्र लोकमतच्या फेसबुकच्या वॉलवर पोस्ट करा. उत्कृष्ट छायाचित्रास लोकमतकडून एक खास बक्षीस देण्यात येणार आहे. तर लॉग ऑन करा www.facebook.com/lokmat

No comments:

Post a Comment