आखातातील वादळाचे धूळीचे कण मुंबईवरून निवळले आणि शहराच्या तापमानात तीन
अंश सेल्सिअसने वाढ झाली. शनिवारी शहराचे कमाल तापमान ३५.३ अंश सेल्सिअस
एवढे नोंदवण्यात आले असून, चढत्या पार्याने मुंबईकर हैराण झाले आहेत.
मागील तीन दिवसांपासून मुंबईवर पसरलेले धूळीचे कण सूर्यकिरणांना अडथळे ठरत होते. त्यामुळे मुंबईच्या तापमानात किंचित घट नोंदवण्यात आली होती. शनिवारी मात्र पारा चढल्याने शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात कमालीची उष्णता जाणवत होती. विशेषत: दुपारी वाहणार्या उष्ण वार्याने मुंबईकरांचा जीव नकोसा केला होता.
विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या संपूर्ण भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे.
राज्यात सर्वांत जास्त तापमान सोलापूर येथे ४१.३ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे १४.७ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले आहे.
४८ तासांसाठी हवामान अंदाज आकाश काही प्रमाणात ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३९, १७ अंश सेल्सिअस राहील.
शहर तापमान
(कमाल)
जळगाव 40.4
अकोला 40.7
अमरावती 40.2
चंद्रपूर 41.2
वर्धा 40.5

No comments:
Post a Comment