मुंबई
महानगर
पालिकांच्या
निवडणुका
होताच
बेस्टने वीज
दरवाढीचा
मोठा शॉक दिला
आहे. बेस्टने
महाराष्ट्र
राज्य
विद्युत
नियामक
आयोगाला सादर
केलेल्या
प्रस्तावात
किमान ३६ ते ४३
टक्क्यांची
वीज दरवाढ
सुचवली आहे.
येत्या एक
एप्रिलपासून
नवीन दर लागू
होण्याची
शक्यता आहे. या
दरवाढीचा
सर्वात मोठा
फटका किमान
वीज वापरणा-या
सुमारे सहा
लाख
ग्राहकांना
बसणार
आहे.
बेस्टची ३ हजार ५५७ कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी बेस्ट प्रशासनाने वीज दरवाढ सुचवली आहे. बेस्टचे उत्पन्न व खर्चाच्या आधारावर बेस्टने तयार केलेला दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाला पाठवून दिला आहे. त्यामध्ये दारिद्य रेषेखालील वीज ग्राहकांच्या विजेच्या दरात वाढ सुचवलेली नाही. मात्र सर्वसामान्य तसेच कमशिर्अल वीज ग्राहक आणि औद्योगिक वीज ग्राहकांच्या दरात मोठी वाढ सुचवली आहे.
मुंबईत बेस्टचे सुमारे नऊ लाख वीज ग्राहक आहेत. त्यापैकी सहा लाख ग्राहक दरमहा १०१ ते ३०० युनिट वीज वापरतात. त्यांचे वीजेचे दर ४१ टक्क्यांनी वाढणार आहेत. सध्या १०१ ते ३०० युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट दर ३ रुपये ३० पैसे दर आहे. तो ५ रुपये ५० पैसे होईल. कमशिर्अल वीज दरातही ४५ टक्क्यांनी वाढ सुचवली आहे. का बिज
ग्राहकांच्या हरकती ऐकणार २६ मार्चला!
वीज दरवाढीच्या प्रस्तावावर काँग्रेसचे सदस्य रवी राजा यांनी तीव्र नाराजी दर्शवली. येत्या २३ फेब्रुवारीला बेस्ट समितीची बैठक आहे. समितीच्या सदस्यांना याची माहिती न देता दरवाढीचा प्रस्ताव थेट विद्युत नियामक आयोगाला पाठवून दिला आहे. काँग्रेसचा दरवाढीला विरोध असेल असे रवी राजा यांनी स्पष्ट केले.
दरम्यान वीज नियामक आयोगाने या दरवाढीवर हरकती व सूचना मागवल्या आहेत. २६ मार्चला सकाळी अकरा वाजता कफ परेड येथील र्वल्ड ट्रेड सेंटरमध्ये यावर सुनावणी होईल. ग्राहकांच्या व स्वयंसेवी संस्थांच्या तक्रारी ऐकल्यावर दर निश्चित होतील. या सुनावणीमध्ये काही स्वयंसेवी संस्था वगळता एकही लोकप्रतिनिधी ठामपणे वीज दरवाढीला विरोध करीत नाही, असा अनुभव आहे. एक एप्रिलपासून नवीन वीज दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे.

No comments:
Post a Comment