Sunday, February 19, 2012

Mumbai Mono Metro ( मुंबईत धावली मोनो )

वडाळा ते भक्ती पार्क मार्गादरम्यान मोठ-मोठय़ाने भोंगे वाजवत धीम्या गतीने धावलेली हिरव्या रंगाची मोनोरेल शनिवारी मुंबईकरांचे विशेष आकर्षण ठरली.
-------------
सकाळी १0 ते १२ दरम्यान एमएमआरडीएने घेतलेल्या चाचणीत मोनो दिमाखात धावली. मोनो किती सुरक्षित आहे आणि तांत्रिकदृष्ट्या ती सक्षम आहे का? हे या चाचणीत तपासण्यात आले.
----------------
पहिली मोनोरेल संत गाडगे महाराज चौक-वडाळा-चेंबूर या मार्गावरील चेंबूर ते वडाळा या टप्प्यात धावणार आहे.
---------------
२५ मिनिटांत
- संत गाडगे महाराज चौक ते वडाळा
१९ मिनिटांत
- वडाळा ते चेंबूर
--------------
आवश्यक्तेनुसार चाचण्या पुन्हा घेण्यात येतील. मोनोचा आवाज ७५ डेसिबलपेक्षा कमी असल्याने मुंबईकरांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार नाही. अशा १५ मोनोरेल मुंबईत दाखल होणार असून, त्यांचा रंग लाल, निळा आणि हिरवा असेल.
- कानेसन वेलपिल्ले (अध्यक्ष, स्कूमी इंटरनॅशनल)

------------------
थोडक्यात मोनो
रेल्वेची लांबी - ४५ मीटर / देखभाल आगार - १ / फलाटांची लांबी - ६५ मीटर / गाड्यांची रचना - ४ डबे / नियोजित वेग - ८0 किमी प्रतितास / सरासरी वेग - ३२ किलोमीटर / सीसी टीव्ही - ओसीसी स्टेशन / सूचित केंद्र - मराठी, हिंदी, इंग्रजी / प्रवासी क्षमता - ६००

No comments:

Post a Comment