Monday, February 6, 2012

मुंबई - वेस्टर्न रेल्वे होणार 'फास्टर' रेल्वे(western railway will be faster railway)

मुंबईच्या लाइफलाइनचा एक भाग असलेली वेस्टर्न रेल्वे आता 'फास्टर' रेल्वे बनणार आहे. या मार्गावरील डायरेक्ट करंट (डीसी) प्रणालीचे अल्टरनेट करंट प्रणालीत (एसी) रुपांतर करण्याचा अंधेरी ते चर्चगेट दरम्यानचा शेवटचा टप्पाही रविवारी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला असून सुमारे आठशे कामगार आणि अधिका-यांच्या टीमने हा 'जम्बो मेगाजॉब' नियोजित वेळेआधीच फत्ते केला. या परिवर्तनामुळे पश्चिम रेल्वेवरील गाड्यांचा वेग आणि संख्याही वाढणार असून वीजेचीही मोठी बचत होणार आहे.

' डिझेल इंजिन लोकल'
प्रवाशांना 'जम्बोब्लॉक'ची फार झळ बसू नये म्हणून अंधेरी ते विरारच्या दरम्यान १२४ लोकल आणि तीन डिझेल इंजिनच्या गाड्या चालवण्यात आल्या. अंधेरी ते चर्चगेटसाठीही काही डिझेल गाड्या चालवण्यात आल्या. बेस्टनेही जादा बस रस्त्यावर उतरवल्या होत्या.

रिक्षा-टॅक्सीचालकांनी फायदा घेतलाच...
प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे, बेस्टने उपाय योजूनही रविवारच्या गदीर्च्या तुलनेत ते अपुरेच पडले. या परिस्थितीचा गैरफायदा नेहमीप्रमाणे रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी उठवलाच. जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांकडून जादा पैसे उकळणे यांसारखे प्रकार स्टेशनांबाहेर दिसत होते.

No comments:

Post a Comment