Sunday, February 19, 2012

Music Therapy Treatment ( मुंबई त म्युझिक थेरपीने उपचार )

सुमधूर स्वरांच्या माध्यमातून मनावरच नव्हे, तर वेगवेगळया व्याधींवरही यशस्वीपणे उपचार केले
जातात. संगीताच्या श्रवणाने मनातील हल्लकल्लोळ कमी होतो, चंचलता कमी होऊन
एकाग्रता वाढते, म्हणूनच या पद्धतीचा वापर अनेक ठिकाणी होताना दिसतो. मुंबई  विद्यापीठाचे जीवभौतिकशास्त्र विभाग आता म्युझिक थेरपीला सायंटिफिक परिमाण
 देणार आहे. तसे संशोधन मुंबई विद्यापीठाच्या जीवभौतिकशास्त्र विभागाने सुरू केले आहे.
म्युझिम थेरपी ही संकल्पना फार जुनी आहे. त्याचा गंधर्व वेद चिकित्सा असा उल्लेख सामवेदातही आहे. कुठलाही राग थेरोपेटीक एजंट म्हणून काम करतो. रागातील कोमल स्वर मेंदूला शिथील करतो आणि झोप देतो तर शुद्ध स्वर ऊर्जा किंवा जागरुकता देतो. मुंबई विद्यापीठाच्या बायोफिजिक्स विभागाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. फिजियोग्राफ मशीनने मेंदू., हृदय, स्नायू, डोळे आदींचे इलेक्ट्रिक सिग्नल मोजले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचा एक गट तयार करून त्यांना संगीताचे राग वेगवेगळया वेळेत ऐकविले जातील. त्यासाठी ज्येष्ठ सरोदवादक विवेक जोशी यांच्या संगीताची निवड करण्यात करण्यात आली आहे.
प्राथमिक स्तरावर केलेल्या प्रात्यक्षिकात फिजियोग्राफ मशीनने मेंदू उत्तेजित झाल्यानंतरचे अल्फा, बीटा, गॅमा सिग्नलमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
---------------------
उदासीनता, रक्तदाब, हृदयाचे आजार, निद्रानाश याव्यतिरिक्त गरोदरपणा, मुलांचा चिडखोर स्वभाव यात संगीत उपचार पद्धती प्रभाव ठरल्याचे दिसते.
-----------
संगीत ऐकल्याने मन प्रसन्न वाटते, हे आपण जाणतोच. पण या उपचार पद्धतीला शास्त्रीय आधार मिळवून देण्याचे संशोधन हाती घेतले आहे. काही संस्था याविषयी सातत्याने काम करीत आहेत. संबंधित विषयाची सर्व पार्श्‍वभूमी, डिझाईन, एथिकल्स, रेकॉर्डिंग करून अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचू.
- डॉ. प्रभाकर डोंगरे
जीवभौतिकशास्त्र विभागप्रमुख, मुंबई विद्यापीठ
--------------
संगीतोपचारावर संशोधन होत आहे, ही निश्‍चितच चांगली बाब आहे. संशोधनात काळानुरुप संगीत स्थितंराचाही विचार करावा लागेल. रागाचे स्वरूप बदलले आहे. वेगवेगळ्या गायकांच्या वा वादकांच्या संगीताचा प्रयोग विद्यार्थ्यांवर करावा लागेल. संगीतातील रागांचा जाण असलेले की संगीताची फारशी माहिती नसलेले, की दोन्ही पद्धतीचे विद्यार्थी प्रयोगासाठी घ्यायचे, याचा विचार मुंबई विद्यापीठाने करावा.
- जे. एम. कळसणे, संगीत शिक्षक
-------------------

No comments:

Post a Comment