Thursday, February 23, 2012

टीवी वरील फसवेगिरी ( Tv channels doing Fraud Program )


रात्री टी.व्हि. वर तुम्ही हा कार्यक्रम पहिला असेल कधीतर....

ZEE TV, NDTV IMAGINE & COLOURS वर रात्री लोकांना उल्लू बनवण्याचे काम केले जाते अश्या कार्यक्रमाच्या माध्यमातून.

▶वरील फोटो मध्ये कोण 2 स्टार्स आहेत एवढा सोपा त्यांचा प्रश्न,एखादा 90 वर्षाचा म्हातारा पण त्याचे उत्तर देईल.
पण,खरे तर हे आहे की होस्ट कधी आपला फोन उचलत नाही किंवा आपल्याला फोन करत नाहीत.
त्यांना जे फोन येतात ते सर्व फेक कॉल्स असतात(त्यांच्याच ऑफिस मधील.). आणि मुद्दाम खोटे उत्तर संगितले जाते,ते पाहून पाहणार्‍याला वाटावे हे खूप सोपे आहे आणि त्याने कॉल करत राहावे आणि मिनिटाला 10-15 रुपये खर्च करावे.
विचार करा पूर्ण भारतातून किती कॉल्स येत असतील,आणि हे रोज अशी फसवेगिरी करून लाखो रुपये लुबाडतात. 

▶आता वरील फोटो बद्दल बोलायचे झाले तर 90 वर्षाचा म्हातारा सांगेल संजय दत्त आणि अक्षय कुमार आहेत.
पण फोन वर आलेले उत्तर बघा कसे आहेत.

▶कॉल1: सलमान खान आणि शाहरुख खान 
▶कॉल2: विरेन्द्र सहवाघ आणि ऋतिक रोशन
▶कॉल3: इरफान खान आणि अजय देवगण.

▶पूर्ण 1-2 तास अशीच फसवेगिरी सुरू असते आणि आपली काही लोक पैशांच्या लालचिपणामुळे फोन करून आपले पैसे घालवत असतात.
आशी फसवेगिरी पूर्ण भारतभर दाखवले जाते आणि आपले सरकार डोळे मिटून बसलेले असते.

▶मित्रांनो,तुम्हीच आता ही पोस्ट शेअर करा आणि सर्वांच्या निदर्शनास आणून द्या ही गोष्ट,म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीचे पैसे अश्या फसवेगीरीत अडकूनये.

कालच माझ्या मित्राच्या मित्राने 30रुपये फुकले म्हणून त्याला ही पोस्ट लिहावी लागली....आणि मी आपल्या पेजवर टाकली..

◀◀◀ शेअर करा,आणि फसवेगिरी चा परदा फाश करा... ▶▶▶
जनहित में जारी. 

No comments:

Post a Comment