Sunday, February 26, 2012

अत बीएसएनएल चे तिन टॅब्लेट्स मार्केट मधे (Now BSNL 3 Tablets in Market )

असे आहेत टॅब्लेट्स..........
टी पॅड आयएस ७0१ आर :
१ गेगा हर्ट्झ प्रोसेसर, २५६ एमबी रॅम, वायफाय, इनबिल्ट २ जीबी मेमरी, ३२ जीबीपर्यंत वाढविता येणार. किंमत ३,२५0 रुपये
टी पॅड डब्ल्यूएस ७0४ सी :
५१२ एमबी डीडीआर ३ रॅम, टीव्हीला जोडण्याची सुविधा, किंमत १0.९९९ रुपये
टी पॅड डब्ल्यूएस ८0२ सी :
५१२ एमबी डीडीआर ३ रॅम, १.२ जीएचझेड प्रोसेसर, ग्लोबल पोजिशन सिस्टीम. किंमत १३,५00.
-------------------------

जगातील सर्वांत स्वस्त टॅब्लेट असा मान मिळविणार्‍या 'आकाश' या भारतीय आयपॅडच्या स्पर्धेत आता बीएसएनएलने ३ टॅब्लेट्स आणली आहेत. त्यांची किंमत ३२५0 रुपयांपासून राहणार आहे. ही टॅब्लेट्स मार्केटमध्ये दाखल होताच, या क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.
'टी पॅड आयएस ७0१ आर', 'टी पॅड डब्ल्यूएस ७0४ सी' आणि 'टी पॅड डब्ल्यूएस ८0२ सी'अशी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या तीन टॅब्लेट्सची नावे आहेत. ती अँड्रिड्युड २.३ ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार आहेत. यातील पहिल्या दोन टॅब्लेट्सची स्क्रीन ७ इंच तर तिसर्‍याची स्क्रीन ८ इंच आहे. त्यांची क्षमता २ जीबी ते ३२ जीबीपर्यंत आहे तसेच त्यातील एक थेट टीव्हीलाही जोडता येणार आहे, अशी माहिती बीएसएनएलच्या सूत्रांनी दिली. नोएडास्थित पॅन्टेल या कंपनीमार्फत याची निर्मिती करण्यात येणार आहे. बीएसएनएलच्या डाटा प्लॅनसोबत ती स्वस्तात उपलब्ध होतील, असेही या सूत्रांनी सांगितले.

No comments:

Post a Comment