Sunday, April 1, 2012

वांद्रे-वरळी सी लिंकच्या टोलदरात वाढ ( Travelling Bandra-Worli Sea Link More costly from 1st April )

मुंबई : वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून सुसाट गाडी नेण्यासाठी आता कारचालकांना पाच रुपये जादा मोजावे लागणार आहेत. या सागरीसेतूच्या टोल दरात वाढ जाहीर करणारी अधिसूचना राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने काढली आहे.

आजपासून  कार, जीप या वाहनांसाठी असलेला ५० रुपयांचा टोल  ५५ रुपये इतका करण्यात आला आहे.
तसंच १२ ते २० प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मिनीबससाठी आता टोलपोटी ७५ रुपयांऐवजी ८० रुपये मोजावे लागतील, तर ट्रक, बस या वाहनांसाठी आता १०० रुपयांऐवजी ११० रुपये टोल आकारला जाईल.
वांद्रे ते वरळीपर्यंतचा सागरी सेतू तयार झाल्यापासून गेल्या तीन वर्षांत टोलच्या दरात वाढ करण्यात आली नव्हती.
नव्या आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे. त्यामुळं नवं दर लागू होत असून आधीच महागाईने लोटलेल्या जनतेला त्याचा आणखी फटका बसणार आहे

No comments:

Post a Comment