Friday, April 20, 2012

जीवलग मित्राच्या मृत्यूमुळे मॉर्केल आफ्रिकेला परतला

चेन्नई सुपर किंग्जचा महत्वाचा खेळाडू अल्बे मॉर्केल दक्षिण आफ्रिकेला परतला आहे. त्याचा जीवलग मित्र लुईस व्होस्र्टर याची मंगळवारी (दि. १७) सशस्त्र दरोडेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. लुईसच्या अंत्यविधीसाठी मॉर्केल तातडीने आफ्रिकेला रवाना झाला. तो स्पर्धेसाठी परतणार असला तरी, याबद्दलची तारीख निश्‍चित नाही. चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘‘जीवलग मित्राच्या मृत्यूमुळे मॉर्केलला धक्काच बसला. आम्ही त्याच्या दु:खात सहभागी आहोत.’’ मॉर्केलच्या अनुपस्थितीचा चेन्नईला मोठा फटका बसू शकतो. आधीच स्टार ओपनर मुरली विजय फ्लाप ठरत असल्याने ते चिंतेत आहेत. मुरली आतापर्यंत ५ सामन्यांत केवळ ३१ धावाच करू शकलाय. 

No comments:

Post a Comment