र्जमनीतील विजेवर धावणारी मोटार.. सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे..
अत्याधुनिक साधनांद्वारे जलसंवर्धन आणि त्यातील रसायनशास्त्राचे महत्त्व,
कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी होणारे प्रयोग आणि अगदी र्जमन खानपान
संस्कृतीही सध्या मुंबईत ‘मिनी र्जमनी’मध्ये पाहण्यास मिळत आहे. निमित्त
आहे ते चर्चगेट येथील क्रॉस मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडो-र्जमन
अर्बन प्रदर्शन’चे.
भारत आणि र्जमनी या देशांनी शहरविकास नियोजन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पर्यावरण, शिक्षण, संस्कृती, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशाने ‘इंडो-र्जमन अर्बन प्रदर्शन’चे आयोजन करण्यात आले आहे.
२२ एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून बीएएसएफ, सीमेन्स, लॅप इंडिया, इंडो-र्जमन चेंबर ऑफ कॉर्मस, सॅप, बजाज अलियान्झ, बॉश, लॅनक्सेस, फेडरल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँण्ड रीसर्च
यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या पॅव्हेलियनमध्ये मुंबईकरांना मोफत प्रवेश आहे.
र्जमनीमध्ये सौरऊर्जेचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. सौरऊर्जेतून रूपांतरित करण्यात आलेल्या विजेवर तेळील मोटारी रस्त्यांवर धावत आहेत. बर्लिनसारखी शहरे हिरवीगार करण्यावर भर दिला जात असून, कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याचे प्रयत्न केले जात
आहेत. शहरीकरण वाढत असल्याने वाहतूक व्यवस्था बळकट केली जात आहे.
ग्रंथालये अत्याधुनिक केली जात असून, पर्यावरणाची होणारी हानी रोखली जात आहे, अशा विविध बाबी छायाचित्रे आणि चित्रफितीच्या माध्यमातून प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.
जगावेगळे पॅव्हेलियन..
चौकोनी, षटकोनी, वतरुळाकार आणि लंबवतरुळाकार अशा आकाराचे उभारण्यात आलेली पॅव्हेलियन्स लाल, सफेद, करड्या रंगात आहेत. सूर्यकिरणे आत येतील आणि हवा मोकळी राहील, अशा तर्हेने पॅव्हेलियनची रचना करण्यात आली आहे. काही पॅव्हेलियन्सला बाहेरून हिर्याचा आकार देण्यात आला असून, यासाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. मॉर्क्स हेन्सडॉर्फ या कलाकाराची ही कमाल. त्यानेच पॅव्हेलियनची रचना केली आहे.
मुंबईसारख्या मेगासिटीचा वेगाने विकास करताना ‘इंडो-र्जमन अर्बन प्रदर्शन’ मैलाचा दगड ठरणार असून, या माध्यमातून विकासाचे नवे मार्ग सापडतील. र्जमनी बांधकाम क्षेत्र आणि उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरात आघाडीवर असून मुंबईसह पुणे, दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरू या शहरांत अत्याधुनिक तंत्रज्ञान सादर करण्याची संधी मिळत असल्याने आनंद आहे.
- डॉ. पीटर रॅमसोएर (केंद्रीय वाहतूक,
इमारत आणि शहर व्यवहार मंत्री, र्जमनी)
मुंबईत घरांच्या वाढत्या किमतींमुळे परवडणार्या घरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका वाढीव एफएसआयच्या माध्यमातून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत असून, प्रदर्शनाच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्था बळकट करण्यास मदत मिळेल.
- सुबोधकुमार (आयुक्त,
मुंबई महापालिका)

No comments:
Post a Comment