Sunday, April 15, 2012

सौरऊर्जेवर देशातील पहिला ट्रॅफिक सिग्नल ( On Solar energy Country first Traffic Signal )

पश्‍चिम उपनगराचे शेवटचे टोक आणि पालिकेचा वॉर्ड क्रमांक १ची सुरुवात अशी ओळख असणार्‍या दहिसरच्या शिरपेचात नवा तुरा रोवला गेला आहे. बोरिवली, दहिसर (पू.) लिंक रोड येथील चार ठिकाणी रेडिओ कंपन लहरीच्या साहाय्याने सौरऊर्जेवर चालणारे ट्रॅफिक सिग्नल बसविण्यात आले असून, हे देशातील पहिले ट्रॅफिक सिग्नल ठरले आहेत.
दहिसर (प.) लिंक रोडवरील डिमार्ट जंक्शन, कांदरपाडा जंक्शन, आयसी कॉलनी जंक्शन, शांती आo्रम जंक्शन या ठिकाणी हे चार ट्रॅफिक सिग्नल बसविण्यात आल्यामुळे येथील नागरिकांना व वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशा प्रकारे देशात रेडिओ लहरीवर आधारित सौरऊर्जा ट्रॅफिक सिग्नल बसविण्यात आल्यामुळे विजेची मोठी बचत होणार असून, तासन् तास ऊन-पावसात ट्रॅफिक सिग्नलचे नियंत्रण करणार्‍या ट्रॅफिक पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुण्याच्या न्यूक्लिओनीक्स या कंपनीने या रेडिओ लहरी - सौरऊर्जेवर आधारित ट्रॅफिक सिग्नलची निर्मिती केली आहे. या यंत्रणेत विद्युत खांबावर पॅनल आणि बॅटरी बसविलेली असते.
■ या ठिकाणी सौरऊर्जेद्वारे सिग्लनला गती मिळण्यासाठी रेडिओ कंपन लहरी व या सिग्नलवर नियंत्रण ठेवणारा लॉजिक कंट्रोल प्रोग्राम बसवलेला असतो. प्रत्येक जंक्शनवर ८-९ सिग्नल खांबे असतात. यावर एक मास्टर कंट्रोलर एका खांबावर बसवलेला असतो.
■ मास्टर कंट्रोलर हा या ८-९ सिग्नलला एका ठरावीक ठिकाणी सूचना देतो. अशा प्रकारे ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होते, अशी माहिती आर (उत्तर) व आर (मध्य) प्रभाग समिती अध्यक्ष अभिषेक घोसाळकर यांनी दिली.
News taken from http://epaper.lokmat.com

No comments:

Post a Comment