किंग्ज
इलेव्हन पंजाबचा कर्णधार अँडम गिलख्रिस्ट हा तसा कूल खेळाडू. अलीकडील
काळाचा ऑस्ट्रेलियन खेळाडू असूनही असूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत
असताना संपूर्ण कारकिर्दीत त्याने सभ्यपणा व खिलाडूवृत्ती जपली. त्याला
क्वचितच कुणी रागावताना बघितले आहे. मात्र, कोलकता नाइट रायडर्सविरुद्ध
झालेल्या लढतीनंतर तो पंजाब क्रिकेट संघटनेवर (पीसीए) बर्यापैकी रागावलेला
दिसला. या सामन्यात पराभूत झाल्याचा राग त्याने पीसीएवर काढला वगैरे
नव्हता. गिलीच्या रागावण्यामागे कारणदेखील गंभीरच होते. झाले असे की
मोहालीत बुधवारी (दि. १८) झालेल्या लढतीदरम्यान एक प्रेक्षक थेट
खेळपट्टीपर्यंत पोहचला. पोलिस त्याला बाहेर घेऊन जात असताना त्या
प्रेक्षकाने काही कागददेखील भिरकावले. इतकी मोठी सुरक्षा व्यवस्था
असूनदेखील सामना सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे गिली चांगलाच रागावला
होता. सामना संपल्यानंतर त्याने आपल्या या रागाला वाट मोकळी करून दिली.
‘‘प्रचंड सुरक्षा व्यवस्था भेदून एखादी व्यक्ती थेट खेळपट्टी व
खेळाडूपर्यंत पोहचते, ही अतिशय गंभीर
गोष्ट आहे. अशा क्षणी खेळाडूसोबत कोणतीही दुर्घटना घडू शकते. संबंधित
संघटनांनी या गोष्टींकडे अतिशय अतिशय गांभीर्याने बघायला हवे. यापुढे अशी
घटना घडणार नाही, याकडे जातीने लक्ष देण्यात यावे,’’ अशा शब्दांत गिलीने
पीसीएला फटकारले.
No comments:
Post a Comment