Friday, April 20, 2012

आयपीएल मध्ये फक्त खेळाडूंची गर्दी निर्माण होईल ( IPL only rush of Players )

भारतात होत असलेल्या इंडियन प्रिमीयर लीगची (आयपीएल) निंदा करीत श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाने म्हटले आहे की, या स्पर्धेमध्ये फक्त खेळाडूंची गर्दी निर्माण होईल, कसोटी क्रिकेटसाठी सक्षम असलेले गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट खेळाडू तयार होणार नाहीत.
दुबई येथील श्याम भाटिया वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी रणतुंगा यांनी वरील व्यक्तव्य केले. ते पुढे म्हणाले, ‘‘भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) आयपीएलद्वारे भारतातील क्रिकेटची स्थिती खराब करण्याला जबाबदार आहे. भारतीय संघाने विश्‍वचषक आपल्या नावावर केला; परंतु कसोटी क्रिकेटमध्ये तुम्ही त्यांची परिस्थिती पाहा. हा संघ कसोटीमध्ये बहुतेक देशांकडून पराभूत झाला आहे. आयपीएलच्या माध्यमातून सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, वेंकटेश्‍वर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारखे उत्कृष्ट खेळाडू मिळणार नाहीत. देशातील बहुतेक क्रिकेट बोर्डांना बीसीसीआयच नियंत्रण करीत आहे; कारण ते सर्वांत श्रीमंत बोर्ड आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत जर बीसीसीआय एखादा मुद्यावर बोलत असेल, तर त्याच्या विरोधात कोणीच काही बोलत नाही; कारण अन्य क्रिकेट बोर्डला त्याच्याकडून फायदा होत असतो. अशातच आयसीसीचे अधिकारीसुद्धा क्रिकेटला वाचविण्याऐवजी त्यांच्या पैशांवर त्यांची नजर असते.’’ रणतुंगाने शेवटी असे सांगितले की, पैशाने मालामाल असलेल्या या लीगच्या हव्यासापाई कोणीही खेळाडू आपल्या देशाला दुय्यम स्थान देत आहे. कोणीही खेळाडू आपल्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याबाबत विचार करीत नाही. त्याने सांगितले की, मलिंगाने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून नवृत्ती घेतली आणि चक्क बोर्डाने याबाबत काहीच केले नाही. आयपीएल अशा खेळाडूंचा खेळ आहे, ज्याला क्रिकेटची समज नाही.

No comments:

Post a Comment