Saturday, April 28, 2012

6 लाख उत्पन्न असणाऱ्यांना गॅस सिलेंडर महाग मिळण्याची शक्यता


एलपीजी गॅस सिलेंडर
एलपीजी गॅस सिलेंडर
सहा लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना आता गॅस सिलेंडर महाग मिळण्याची शक्यता आहे. श्रीमंताना एलपीजी गॅसवर सूट न मिळण्यासाठी सरकारने लवकरच निर्णय घ्यायला हवा, असं पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसवर स्थापन केलेल्या समितीने म्हटलं आहे.

या समितीने आपला अहवाल सरकारला सुपूर्द केला आहे. सहा लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना एलपीजी गॅसवर सब्सिडी मिळू नये, अशी शिफारस या समितीने केली आहे. म्हणजेच सहा लाख उत्पन्न असणाऱ्यांना या समितीने श्रीमंतांच्या श्रेणीत ठेवलं आहे.
त्याचबरोबर डिझेल गाड्यांवर कर लावण्यात यावा, जेणेकरुन डिझेलचा वापर कमीतकमी होईल, अशीही शिफारस समितीने केली आहे.

घटनात्मक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना या श्रेणीत ठेवण्यात यावं, असं समितीने म्हटलं आहे.

सरकार या मुद्द्यावर विचार करत असल्याची माहिती, समितीने दिली आहे.

1 comment:

  1. This is really great. Keep it up the good going. Really very great blog this has given me all the information that i needed, good for visiting daily it will increase our knowledge. Best luck for future.

    ReplyDelete