मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीचं प्रचार अभियान सुरू झालंय.
प्रचारासाठी वेगवेगळ्या कल्पना दिसून येत आहेत. काँग्रेस नेते नारायण राणे
यांचा मुलगा आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी अनोखं
भ्रष्टाचार कॅलेंडर प्रकाशित केलंय. शिवसेना आणि भाजपवर या
कॅलेंडरच्या माध्यमातून मागील पाच वर्षात केलेले भ्रष्टाचार दाखवण्यात आले
आहेत. हे कॅलेंडर आता मुंबईत घरोघरी वाटण्यात येणार आहे.
या अनोख्या कॅलेंडरवर प्रत्येक पानावर भ्रष्टाचार छापण्यात आलाय. १२ पानांच्या या कॅलेंडरवर १२ आरोप छापण्यात आले आहेत. आरोपांसह भ्रष्टाचाराची माहितीही कॅलेंडरवर छापण्यात आली आहे. पाणी, हॉस्पिटल, आरक्षित भूखंड, नाले सफाई हे प्रश्न कॅलेंडरच्या माध्यमातून लावून धरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर शिवसेना बीजेपीचा मॅनिफेस्टो छापण्यात आलाय. यातून लोकांना पुन्हा आठवण करून देण्यात आलीय की, भाजप-सेनेनं काय आश्वासनं दिली होती. भाजप सेनेनं नेमकी कोणती आश्वासनं पूर्ण केली आणि कोणती नाहीत.
कॅलेंडरच्या पानावर पुरावे ठेवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र शिवसेनेने भ्रष्टाचाराच्या या आरोपांचा इन्कार केलाय. नितेश राणे यांनी अशी पाच लाख कॅलेंडर छापली असल्याचं सांगण्यात येतंय.

No comments:
Post a Comment