Wednesday, December 21, 2011

मुंबई लोकलचा डबा आज घसरला

मुंबई - छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) ते कल्याण दरम्यान धावणाऱ्या लोकलचा डबा आज (बुधवारी) सकाळी मश्जिद स्टेशनजवळ घसरला. या अपघातात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. सीएसटीहून कल्याणकडे जाणाण्या लोकलचा सहावा डबा आज सकाळी साडेआठच्या सुमारास रुळावरून घसरला. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक खोळंबिली होती. मात्र, काही वेळातच वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसून, अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याते रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

No comments:

Post a Comment