मुंबई: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने
फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल येत्या २५ मे रोजी
ऑनलाईन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना शुक्रवारी दुपारी एक वाजता हा
निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर पाहाता येणार आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे एक लाख ४८ हजार विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. राज्यातील आठही विभागीय मंडळाच्या स्तरावर निकालाची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे २५ मे रोजी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

विद्यार्थ्यांना या
निकालाची ऑनलाईन प्रिंट विद्यार्थ्यांना काढता येईल. हीच प्रिंट
प्रवेशासाठी अधिकृत मानली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मूळ
गुणपत्रिकेची वाट पाहावी लागणार नाही.
No comments:
Post a Comment