भरभरून प्रमोशन केल्यानंतर दूरदर्शन आणि स्टार प्लसवर आमीर खानच्या 'सत्यमेव जयते' या पहिल्या टीव्ही शोचं प्रसारण रविवारी करण्यात आलं. 'सत्यमेव जयते'चा पहिला एपिसोड संपल्यानंतर प्रतिक्रियांचं वादळ सोशल नेटवर्किंगवरून येऊन धडकलंय.
टि्वटरवर हा कार्यक्रमाची चर्चा होतांना दिसतेय. भारतात 'सत्यमेव जयते', 'आमीर खान', 'स्टार प्लस', 'कन्या भ्रूणहत्या' आणि 'दूरदर्शन' या शब्दांचं टि्वटरवर ट्रेडिंग आहे. म्हणजेच या विषयावर टि्वटरवर सर्वाधिक लोक चर्चा करीत आहेत. पहिल्यांदा एका भारतीय टीव्ही शो विषयी टि्वटरवर ही जोरदार चर्चा होत आहे. यापूर्वी अनेक टीव्ही कार्यक्रमांची चर्चा झाली पण ही चर्चा एखाद्या रेकॉर्डसारखी आहे. कारण पहिल्या दहा ट्रेडिंग विषयांपैकी, सात शब्द आमीर खानच्या टीव्ही शो विषयी संबंधित आहेत. आमीरच्या शो विषयी प्रतिक्रिया बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आहेत. पण कार्यक्रमाच्या व्यावसायिकतेवर काही तिखट प्रतिक्रियाही आहेत. बॉलीवूडमधून बोमन इराणी, फरहान अख्तर, कबीर बेदी तसेच प्रीती झिंटाने सत्यमेव जयतेचं कौतुक केलं आहे.
टिवटरवर कोण काय बोलतंय? शबाना आझमी "आमीर खानचा हा कार्यक्रम क्रांती करू शकतो, सखोल रिसर्चकरून प्रत्येक पैलू हाताळण्यात आला आहे. हा कार्यक्रम आपल्या भावनांपर्यंत पोहचतो. आम्हाला विचार करण्यास भाग पाडतोय."
प्रिती झिंटा "आमीर खानचा सत्यमेव जयते हा टीव्ही शो मी पाहतेय, ज्यात भ्रूणहत्येवर चर्चा होत आहे. मी त्यांचं कौतुक करू इच्छीते आणि एक महिला या नात्याने आमीरला धन्यवाद देते."
किरण बेदी माजी पोलिस अधिकारी आणि सामाजित कार्यकर्त्या किरण बेदी यांनीही कार्यक्रमाची वाह वा केली आहे. किरण बेदी म्हणतात, "आमीरची टीवी मालिका सत्येमव मी पाहतेय, खूप चांगला कार्यक्रम आहे, तु्म्ही ही पाहा".
हर्षा भोगले - क्रिकेट कमेन्टेटर "कमीत कमी आमिर खान एवढं काम तरी करतोय, ज्या बद्दल आपण नेहमी गप्पा ठोकत असतो"

News taken from Star Majha
No comments:
Post a Comment